अज्ञात चोरट्याविरुद्ध पातुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल…..
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर शहरात एकाच आठवड्यात 5ते6 घरफोडी तर
पातुर पोलिसांनि गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी….
चोरीच्या घटना वाढल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पातूर तालुका प्रतिनिधी….. येतील बाळापूर नाका परिसरात रहिवासी असलेले राजू किसन तायडे वय 43 वर्षे यांच्या घरासमोरील उभी असलेली स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH30 AF 9212 ही गाडी रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे… पातूर शहरात गेल्या काही दिवसापासून चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले असून यावर पातुर पोलिसांचे कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे . पातुर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर शहरातील नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे चोरीच्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. यापूर्वी झालेल्या चोरीचा तपास लावण्यात पातूर पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे. नेहमीप्रमाणे राजु किसन तायडे हे त्यांची गाडी त्यांच्या घरासमोर उभी करून ठेवतात, त्याचप्रमाणे त्यांनी रविवार एक ऑगस्ट रोजी सदर गाडी लॉक करून ठेवलेली होती. परंतु दोन ऑगस्ट रोजी सकाळी उठून पाहतात तर त्यांच्या घरासमोरील गाडी त्यांना आढळून आली नाही . त्यांनी पातुर पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली पातूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .. फिर्यादी राजू किसन तायडे यांच्या फिर्यादीवरून पातुर पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत..











