पर्यटकांना सोबत लूटमार करणारा एक आरोपी फरार,
वारी हनुमान सागर वरील घटना,
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या वारी हनुमान सागर येथे काही दिवस अगोदर हिंगणी बु येथील दोन युवक धरणावर निसर्गाचा आनंद घेत असताना तेथे अनोळखी दोन इसम आले व या पर्यटकांना वीळा काठीचा धाक दाखवून त्यांच्या जवळून नगदी ३ हजार रुपये व ९ हजार किंमतीचा मोबाईल हिसकावून पसार झाले , सदर युवकांनि या घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांनी दिली फिर्यादी योगेश गजानन ठाकरे, वय २८ वर्षे, भुषन झंवर रा, हिंगणी( बु) यांच्या फिर्यादीवरून यांनी आरोपीचे वर्णन सांगितल्या वरून हिवरखेड पोलिसांनी तपास केला व गुन्ह्यातील आरोपी गणेश मेहताब रा वारी बारुखेडा यास अटक केली असून आरोपी जवळुन मोबाईल नगदी ३ हजार व गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले असून आरोपी विरुद्ध कलम ३९२, ३४ भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, तर या घटनेतील दुसरा आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला, पुढील तपास हिवरखेड ठणेदार धीरज चव्हाण, गोपाल दातीर, यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश तायडे, प्रफुल पवार करीत आहेत,


