हिरा आसलकर
शहर प्रतिनिधी मलकापूर
मलकापूर
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात धनश्रीताई काटीकर पाटील जिल्हाध्यक्ष रासप यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी त्यांनी मराठी साहित्यातील लोक वाड:मय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन अशा सर्वच क्षेत्रात दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे. साहित्यासह लोककलांचे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले आहेत. तसेच तमाशा कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून दिली. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी त्यांनी लोकांमधून मोठी जनजागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्येही त्यांनी शाहिरीतून मोलाचे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांचे चरित्र पोवाड्याच्या माध्यमातून रशियापर्यंत पोहवण्याचे अलौकिक कार्य त्यांनी केले.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रणी असणाऱ्या स्व. अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंति निमित्या. 1 ऑगस्ट ला राष्ट्रीय समाज पक्ष बुलढाणा जिल्हा कार्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
साहित्यसम्राट स्व.अण्णाभाऊंच्या लोकशाहीर, सामाजिक प्रबोधक म्हणून पददलित, वंचित, शोषित समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य तसेच समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा दूर करण्यासाठी वेचलेले आयुष्य अतिशय प्रेरणादायी असून या संदर्भात रासप जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर म्हणाल्या की, जाणिवांनी ओतप्रोत भरलेला सामाजिक परिवर्तनकार, वंचित -शोषितांचा आवाज, सत्यशोधक तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील स्व. अण्णाभाऊंचे योगदान, साहित्य क्षेत्रातील मोलाची कामगिरी ही भावी पिढ्यांसाठी दिशादर्शक व प्रेरणा देणारी आहे. यावेळी धनश्रीताई काटीकर पाटील पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, संतोष वानखेडे शहराध्यक्ष रासप, निलेश सोनोने तालुका अध्यक्ष, सय्यद ताहेर अल्पसंख्यांक आघाडी रासप, प्रा प्रकाश ताटे जिल्हा संघटक, खाजा कुरेशी, इलियास खान पठाण प्रसिद्धीप्रमुख , रोशन वाकोडे प्रसिद्धीप्रमुख , गोविंद वानखेडे तालुका उपाध्यक्ष, मनीष शर्मा , अनंता दिवनाले तालुका अध्यक्ष कर्मचारी सेल व असंख्य रासप कार्यकर्ते उपस्थित होते