विकास कामासोबतच, प्रशस्त मैदान व बाल उद्यानासाठी प्रयत्न करण्याविषयी सुचविले
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी – शिवसेना पक्षाचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी आपल्या शिष्टमंडळासमवेत सोमवार 2 आगष्ट रोजी अहेरी नगर पंचायतीला भेट देऊन मुख्याधिकारी अजय साळवे यांच्याशी विकासात्मक कामे व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमे राबविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केले. अहेरी हे उपजिल्ह्याचे ठिकाण असून खेळासाठी स्टेडियम नसल्याने युवकांना क्रीडागुणापासून मुकावे लागत आहे. त्यामुळे खेळासाठी मैदान व बालकांसाठी उद्यान तयार करणे गरजेचे असल्याचे म्हणत शहरात वाढीव पाणी पुरवठा, पथदिवे (हायमास्ट), घरकुल योजना, घर दुरुस्ती, स्वछता, नाली व मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, शहरातील अंतर्गत रस्ते आदी विषयांवर चर्चा करून प्रमुख सहा मागण्यांचे निवेदनही शिवसेनेचे शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांना दिले.
आणि रात्रौच्या सुमारास बैल व गायी रस्त्यावरच बस्तान मांडून राहत असल्याने गुरांच्या मालकांना आप-आपल्या गोठ्यात बांधण्यासाठी सक्ती करून तसे न केल्यास योग्य ती कार्यवाही करण्याचेही मागणी यावेळी रियाज शेख यांनी केले. मुख्याधिकारी साळवे यांच्याशी शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे नगर विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्याकडे योग्य पाठपुरावा करून नगर विकास कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिले. यावेळी उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे, संघटक बिरजू गेडाम, तालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे, सुभाष घुटे, महिला संघटिका पौर्णिमा इष्टाम, तालुका महिला संघटिका तुळजा तलांडे आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.