गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक येथील पंचवटी मध्ये असलेल्या आडगाव येथील स्वप्नपूर्ती सोसायटी याठिकाणी असलेल्या साम्राज्य फाउंडेशन आडगाव नाशिक च्या वतीने महाराष्ट्रात झालेल्या तुफान पावसामुळे लोकांचे खूप हाल झाले असून तर काही लोकांची घरे सुद्धा वाहून गेली असून तर त्यांच्या वर आजरोजी उपास मारीची वेळ आली असून त्यांना एक छोटीशी मदत म्हणून नाशिक. आडगाव येथील साम्राज्य फाउंडेशन ने छोटीशी मदत करण्यासाठी समोर आली असून ही मदत आडगाव येथील मज्जीद मध्ये. गहू, तांदूळ, साखर, तेल कपडे आणि त्यांना लागणारे गरजू उपयोगी वस्तू वितरित करण्यात आल्या त्यावेळी साम्राज्य फाउंडेशन चे अध्यक्ष. भूषण महाजन आकाश सोनवणे युवराज आहिरे रोहित खरे अनिकेत वाघमोडे गणेश खराट आणि मज्जीद ट्रस्ट चे मतीन भाई बाळू कथाले इत्यादी व साम्राज्य फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.












