अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, पातूर
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व सर्ग विकास समिती अकोला यांच्या सयुक्त विद्यमाने पातुर येथे शेतकऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.समाधानाचं शेत येथे आयोजित एक दिवसीय प्रशिक्षित शिबिराचे उद्धघाटन मिशनचे प्रकल्प संचालक आरीफ शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष कुवरसिंग मोहने तसेच प्रमुख पाहुणे आशीष मुडावतकर, श्रीहरणे सर, ताले व विवरा येथील प्रगतशील शेतकरी देविदास धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रशिक्षित शिबिरात मिशनचे अधिकारी श्री आशीष मुदावडकर सर यांनी जैविक शेती मिशन संकल्पना व उद्देश
,शेतकरी उत्पादक कंपनी व जैविक महासंघ संकल्पना व कार्यप्रणाली, शेअर्स आदि बाबी समजावून सांगतल्या तसेच प्रमाणीकरण बाबत माहीती दिली. आरीफ शहा सर यांनी जैविक किडरोधके व फेरोमन सापळे कसे बनवावे वनस्पतीजन्य किटकनाशक घरच्या घरी करण्याबाबत माहिती दिली याविषयीसह विविध मुद्यानवर मार्गदर्शन केले .
प्रशिक्षणाअंर्तगत ताले सर यांनी शाश्वत जैविक शेती सोबत मधमाशीपालन होऊ शकते हे तितकेच खरे आहे.हे पटवुन देत आपणा सर्वांनीच निसर्गातील मधमाशी या परोपकारी किटकाचे महत्त्व जाणून तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत हे पटवून दिले. मधमाशीपालनासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या सुर्यफुल, बाजरी, मका,सोयाबीन, तूर, शेवगा आणि आवळा या घेतल्या जाणाऱ्या पिकांसोबतच या पिकांची जर योग्य नियोजन करून लागवड केली तर मधमाशीपालन यशस्वी होईल. मधमाशीमुळे होणाऱ्या परागीभवनामुळे इतर पिकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल असे सांगीतले.तसेच श्री मोहने सर यांनी माती परीक्षण चे महत्व,बायोडायनामिक पिक पोषण व कम्पोस्ट,जैविक कुंपन,चर,बांध या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन विनोद क्षिरसागर तर प्रास्ताविक धिरज धोत्रे यांनी केले. उपस्थितांचे आभार सचिन ढोणे यांनी मानले. प्रशिक्षणाचे यशस्वितेसाठी शेतमाऊली जैविक शेतकरी ऊत्पादक कंपनीचे अध्यक्ष सचिन ढोणे,सचिव विनोद क्षिरसागर तसेच संचालक मंडळाचे प्रभुदास बोंबटकार, प्रल्हाद खोकले,अरुण अत्तरकार,दिनेश पजई,सचिन फेंड,अरविंद चव्हाण,हरीष टप्पे,माधुरी ढोणे तसेच कंपनीचे सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.