किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला – राज्यात कोरोनामुळे सुमारे तीनशे पत्रकारांचे निधन झाले आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या या सर्व पत्रकारांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी. तसेच कोरोना संकटामुळेच वृत्तपत्र सृष्टी कमालीची आर्थिक अडचणीत आली आहे. या पाश्र्वभूमीवर शासनाने वृत्तपत्रांसाठी आर्थिक पॅकेज घोषित करावे अशी महत्वपूर्ण मागणी अकोला जिल्हा पत्रकार संघाने केली. मराठी पत्रकार परिषद संलग्नीत अकोला जिल्हा पत्रकार संघ व पातुर तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची संयुक्त सभा आज पातूर येथील आयुर्वेद महाविद्यालच्या सभागृहात आयोजित होती. या सभेत उपरोक्त मागण्यांचे ठराव सर्वसमतीने पारित करण्यात आलेत. कोरोना संकटात पत्रकारांच्या समस्या नव्याने वाढल्या आहेत. मिडियातील पत्रकारांच्या प्रलंबीत समस्या सोडविण्यासाठी जिल्हा पत्रकार संघ कटिबध्द आहे. असा सुर या सभेत व्यक्त करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, विशेष अतिथी म्हणून दुसरे माजी अध्यक्ष माधवराव अंभोरे उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, उपाध्यक्ष गजानन सोमाणी, उपाध्यक्ष रामदास वानखडे, जेष्ठ पत्रकार प्रल्हाद ढोकणे, अविनाश राउत, दिलीप देशमुख, प्रा. अविनाश बेलाडकर, सत्यशील सावरकर, पातुर तालुका पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष अ. कुददूस, प्रदीप काळपांडे, शंकरराव नाभरे, उमेश देशमुख, मोहन जोशी, संगीता इंगळे विराजमान होते. आध्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमचे पूजन व दिप प्रज्वलनाने या सभेस प्रारंभ करण्यात आला. सर्वप्रथम कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांनी सभेत पाच ठराव मांडलेत. त्यात कोनोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी, वृत्तपत्रांना आर्थिक पॅकेज घोषीत करावे, जेष्ठ पत्रकारांच्या पेन्शन योजनतील जाचक अटी रद्द कराव्यात, म्हाडा प्रमाणेच शासनाच्या इतर घरकुल योजनांमध्ये पत्रकारांचे आरक्षण देण्यात यावे, कोरोनासाठी पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून घोषित करावे, शांतता समितीमध्ये पत्रकारांचा समावेश करण्यात यावा. या ठरावांचा समावेश होता. सभेत या सर्व ठरावावर सांगोपांग चर्चा झाली व ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. तत्पूवीa पातुर तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात पातुर तालुका अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार अ. कुददुस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक शौकतअली मिरसाहेब यांनी करून पत्रकार संघाच्या उपक्रमाची माहिती सभेला दिली. जेष्ठ पत्रकार व मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांच्या एकजुटीवर भर दिला. सभेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांनी पत्रकारांना सार्वजनिक जिवनात वावरतांना चरित्र जपण्याचा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे संचालन उमेश देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप काळपांडे यांनी केले. सभेचे समापन राष्ट्रगीताने करण्यात आले. या सभेला कमलकिशोर शर्मा, विलास खंडारे, अजय जागीरदार, नंदु सोपले, लक्ष्मणराव हागे, समाधान खरात, मुकुंद देशमुख, उमेश अलोने, जयेश जग्गड, रमेश ठाकर, दिपक रौंदळे, उत्तमराव दाभाडे, प्रा. प्रविण ढोणे, जय रावत, निलेश सुखसोहळे, सदानंद खारोडे, अनंत अहेरकर, रामभाउ फाटकर, गजानन देशमुख, किरण निमकंडे, प्रमोद कडोणे, सचिन ढोणे, प्रविण दांडगे, श्रीकृष्ण शेगोकार, नासीर शेख, पंजाब इंगळ, सतीष सरोदे, दूलेखा, निशांत गवई, स्वप्नील सुरवाडे, भावेश गिरोडकर, विश्वनाथ सावंत, सुनील गाडगे, प्रा. साजीद शेख, प्रशांत गवई, विशाल बिडवाले, अजिंक्य निमकंडे, कपील पोहरे आदी पत्रकार उपस्थित होते. सभेला जिल्ह्याच्या पाचही तालुक्यातील शंभर पत्रकार उपस्थित होते.

