मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
अकोला येथे दिनांक-२६ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना अकोला चे शिष्टमंडळाने नवनियुक्त जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्विकारल्या बद्दल मा.निमा अरोरा मॅडम यांची सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले व अपंग कर्मचारी व दिव्यांग बेरोजगार यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय बरडे यांनी दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्न/अडचणी सोडविण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांच्या सोबत सभा लावण्याची केलेली विनंती मा.जिल्हाधिकारी मॅडम यांनी मान्य केली. यावेळी संघटनेचे शिष्टमंडळात संजय बरडे (अध्यक्ष), मो.अ.अजीज (सचिव), रविंद्र देशमुख (उपाध्यक्ष), जावेद इक्बाल (माध्यमिक शिक्षण विभाग अध्यक्ष), सोहेल परवेज अली (प्रसिद्धी प्रमुख) सौ.निलीमा आमले महिला आघाडी, कु.माधुरी देठे (सहसचिव), कु.वंदना चौधरी महिला संचालक, श्री.दिलीप सरदार (कोषाध्यक्ष), विकार परवेज (अकोला तालुका सचिव), शहाबुद्दीन मो.निजाम सदस्य, कैलास पडघान सदस्य, संजय कचाले सदस्य इ.पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेला वेळ देऊन प्रत्येकाची आस्थेने विचारपूस केली त्याबद्दल संघटनेचे सचिव मो.अ.अजीज यांनी आभार मानले.