तुळसाबाई कावल चे माहिती पुस्तकाचे विमोचन
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर 31 जुलै 2021
स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे कार्यरत असलेल्या सहा शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाचा सत्कार करण्यात आला.
बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे अविरत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तुळसाबाई कावल विद्यालयाच्या माहिती पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. सेवानिवृत्ती कार्यक्रमांमध्ये एस एस श्रीनाथ प्राचार्य ,तुळसाबाई कावल विद्यालय बाभूळगाव यांनी 34 वर्षे सेवा पूर्ण करून प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेत. अतिशय शिस्तप्रिय व्यक्तिमत्व असलेले प्राचार्य म्हणून त्यांची समाजामध्ये ओळख आहे. जी.एस. तारापुरे उपमुख्याध्यापक पदावरून 30 वर्ष गणित शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. एमजी खंडारे गणित शिक्षिका यांनी 36 वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झाल्यात. प्रा.आर एम मोरे शारीरिक शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेत. ग्रंथपाल डी. व्ही.सपाट यांनी दीर्घ स्वरूपाची 35 वर्ष सेवा देऊन सेवा निवृत्त झालेत. प्रयोगशाळा सहाय्यक एस.टी. ढोणे ह्या सुद्धा सेवानिवृत्त झाले आहेत. सर्व मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा सपत्नीक शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी एम वानखडे सर यांनी केले. सेवानिवृत्त शिक्षकांच्या विषयी मनोगत व्यक्त डॉ. ई. एस. सुर्वे आणि यू.डी. तायडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षा स्नेहप्रभादेवी गहिलोत सचिव, बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर, प्रमुख अतिथी विजयसिंह गहिलोत व्यवस्थापक ,बी.एम.वानखडे प्राचार्य, एस बी ठाकरे उपप्राचार्य, अंशुमानसिंह गहिलोत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आर एस ढेंगे आणि आभार प्रदर्शन एस एस सपकाळ यांनी केले.