सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
बैठकीसाठी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय सचिव गजेंद्र भिसे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमूख पाहूणे राजश्री पाटील आणि मुन्ना काळे हे होते. बैठकीमध्ये मानव सुरक्षा सेवा संघाच्या कार्य व सेवा यावर भाष्य केल्या गेले. त्यानंतर तालुका अध्यक्ष प्रवीण पऱ्हाड यांनी मिटिंगमध्ये चर्चा करताना मेहकर तालुक्यातील प्रत्येक गावा गावात मानव सुरक्षा संघाची शाखा उभारण्यात येणार असून त्यासाठी पुरेपूर प्रयत्न चालू आहे.असे मतं व्यक्त केले आहे. वरिष्ठांनी मेहकर तालुका कार्यकारिणीची कौतुक करत संघटनांवर भर देण्यास सांगितले. बैठकीसाठी गजानन लादे, सुनील मोरे, प्रकाश सुखदाणे, विलास लंबे, देवानंद शेजुळ आदी पदाधिकारी उपस्थित होते..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.