विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ: २९ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार राहुल गांधी यांच्या आदेशानुसार तेलंगणा राज्यातील आमदार राममोहन रेड्डी यांची हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यावेळी तातू देशमुख महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा हिंगोली लोकसभा समन्वयक व विधानपरिषद आमदार श्रीमती प्रज्ञाताई सातव यांच्या समक्ष माजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक कांबळे उमेदवारीचा दावा सांगत मला उमरखेड विधानसभा मतदारसंघातून संधी द्यावी व माझ्या नावाची शिफारस पक्षाकडे करण्यात यावी अशी विनंती निरीक्षकासमोर केली आहे.


