कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहेअँड,आप्पाराव मैंन्द पुसद तालुक्यातील माळ पठार भागात असलेल्या लोहरा (ईजारा) येथे वर्षावासातील बुद्ध आणि त्याचा धम्म हा पवित्र ग्रंथ वाचन समाप्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे तथा उपस्थित यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेंच समता सैनिक दलाच्या महीला तुकडीने पंचशील ध्वजाला मानवंदना पर सलामी दिली. “अध्यक्ष स्थानावरून बोलताना अँड आप्पाराव मैंन्द म्हणाले की तथागताचा धम्म हा दुसरा तिसरा काही नसून विज्ञानरूपी सद्धम्म आहे. बुद्ध ढसा धम्माची कास धरल्यास संपूर्ण मानव जातीचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ऑक्टोबर १९५६ साली दीक्षा देऊन नवक्रांती केल्याचे नमूद केले.तसेच अनेक उपस्थित वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित सर्व मान्यवर बौद्ध उपासक धम्मबांधव यांना भोजनदान देण्यात आले.यावेळी प्रामुख्याने अँड आप्पाराव मैंद, सरपंच सुदामराव चिरंगे, खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील, माजी ,जि प सदस्य भोलानाथ कांबळे,पं.स.सदस्य सुधाकर कांबळे, जनप्रबोधिनी संस्थेचे बापूराव कांबळे,शरद ढेंबरे, गौतम वाहुळे,जाधव पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पवार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख,उपाध्यक्ष गजानन टारपे,व्हाईस ऑफ मीडियाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेश ढोले,उपाध्यक्ष विजय निखाते,सरपंच शेळके,सिद्धार्थ कांबळे, तलाठी, ग्रामसेवक,होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू कांबळे यांनी तर आभार पोलीस पाटील धम्मदीप पाईकराव यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य विविध समाज बांधव, बौद्ध उपासक उपासिका प्रामुख्याने उपस्थित होत्या.