कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद तालुक्यातील मांडवा येथे साहित्यसम्राट,लोकशाहिर, डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०४व्या जयंती निमित्त आज,दि.२९सप्टेंबर२०२४रोजी तैलचित्र व चौकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ इंगोले लहुजी शक्ती सेना महा.राज्य संघटक,हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भोलेनाथ कांबळे माजी जि.प.सदस्य,गणेश धर्माळे,शरद ढेंबरे,सचिन खंदारे जि.अध्यक्ष लहुजी शक्ती सेना,सुनिल वानखडे जि.अध्यक्ष लहुजी शक्ती सेना नेर,शंकर लांडगे कोर कमिटी जिल्हाध्य ,विनोद वायदंडे जि.अध्यक्ष उत्तर लहुजी शक्ती सेना,किसन शेळके, आनंद सुरोशे शाखा अध्यक्ष,जनार्धन पडोळे युवा जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना,भारत खंदारे तालुकाध्यक्ष लहुजी शक्ती सेना,देविदास गजभार उपाध्यक्ष लहुजी शक्ती सेना,मनोज गजभार, राहुल हिवाळे, ऋषिकेश जोगदंडे पत्रकार, माणिक गायकवाड, पंकज देडे,अल्का ढोले सरपंच ,विजय राठोड उपसरपंच,दत्तराव पुलाते पोलीस पाटील, सुधाकर चव्हाण तंटामुक्ती समिती अध्यक्ष, वसंता आडे,इत्यादी मान्यवर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर गजानन वानखडे व संच यवतमाळ यांच्या शाहिरी जलसा झाला. यावेळी विशाल घाटे,नामदेव गरडे, मनोहर चव्हाण ,बि.आर.मित्र मंडळ यांचा पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी शाहीर गजानन वानखडे व संच यांनी विनामूल्य शाहीरी जलसा सादर केल्याबद्दल त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक खंदारे यांनी केले तर आभार दिलीप आडे यांनी मानले.