विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यामध्ये कामगार कल्याणच्या वतीने वाटप करण्यात येत असल्यास सेफ तिकीट व गृह उपयोगी वस्तू यांचे वाटप जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावे जेणेकरून त्या ठिकाणच्या कामगारांना सोयीस्कर होईल व होणारी गैरसोय टाळता येईल. उमरखेड तालुक्यातील कामगारांना उमरखेड येथे व महागाव तालुक्यातील कामगारांना महागाव तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी करावे. असे पत्र कामगार आयुक्त महाराष्ट्र जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठविण्यात आले आहे. दि २९/०९/२०२४ रोजी उमरखेड येथे महागाव तालुक्यातील कामगारांना बोलावून त्या ठिकाणी सेफ तिकीट वाटप करण्यात आले त्यामुळे कामगारांचा वेळ श्रम पैसा याचा वाया जात असल्यामुळे या सर्व साहित्याचे वाटप प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात यावे असे निर्देश असताना महागाव तालुक्यातील कामगारांना महागाव येथे वाटप करण्यात यावे तरीही याबाबत जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी अशी आदेश द्यावी अशी विनंती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या महागाव तालुका अध्यक्षा संध्या संदेश रणवीर यांनी पत्राद्वारे केली आहे.


