शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या वतीने 17 ते 30 सप्टेंबर या काळात हिंदी पंधरवाडा निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आज दिनांक 30/09/2024 रोजी सोमवार समापन समारोप करण्यात आले अधिकत्तम हिंदी शब्द स्पर्धेत प्रथम शमशोदिन शेख, द्वितीय नागेश पुराणिक तृतीय जाकेर शेख याना मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भाऊसाहेब ठोंबरे (शाखा प्रबंधक) तर प्रमुख अतिथी म्हणून योगेश जयभाये उपस्थितीत होते. या प्रसंगी या पंधरवाड्या त विविध स्पर्धांचे आयोजन केले होते या स्पर्धेतील विजेत्यांना शाखा प्रबंधक व प्रमुख अतिथी हस्ते पुरस्कार देण्यात आले. या वेळी प्रभाकर भांडवले, सुभाष राठोड, अजय पुंडलिक, शिवाजी अघाव, प्रजापती जगताप,समीर थोरात, कृष्णा बोराडे, अमर पाटील, भालचंद्र बरडे, मन्मथ देवढे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवने,संदिप जाधव,दत्ता सरकटे, बबन झोल आदि उपस्थित होते.