सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
स्थानिक श्री प.दी जैन कला महाविद्यालय अनसिंग ता.जी वाशिम येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता हीच सेवा 2024 या अभियानांतर्गत विविध स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये महाविद्यालयातील परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमामध्ये सहभागी स्वयंसेवकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. त्याचप्रमाणे अनसिंग गावातील नागरिकांना स्वच्छतेचे संदेश देण्यासाठी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरावडा या उपक्रमांतर्गत प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता रॅली गांजरगवत निर्मूलन यासारख्या विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गावातील हॉटेल्स भाजीपाला यासारख्या दुकानदाराना सिंगल प्लास्टिक वापरण्याचे टाळावे असा महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे संस्कार रुजावे, विद्यार्थ्यांना आपापल्या परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी प्रेरणा मिळावी, त्यांनी परिसरातील लोकांना स्वच्छतेसाठी प्रेरित करावे हा महत्त्वाचा उद्देश या उपक्रमाचा असल्याचे प्रतिपादन डॉ बिचेवार सर यांनी केले तसेच स्वच्छता ही सेवा उपक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेना कार्यक्रमाधिकारी डॉ विनोद राठोड यांनी केले याप्रसंगी स्वच्छता ही सेवा याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मुलांनी यांनी स्वच्छता ही सेवा या उपक्रमात सहभागी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बीचेवार सर, डॉ. शर्मा सर ,ग्रंथपाल गोरे मॅडम, संजय जोगदंड , सुनील वराडे यांचे सहकार्य लाभले.











