सिध्दोधन घाटे जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. १५ ऑक्टोबर २०२४ जिल्ह्यातील आमदारकीसाठी सध्या आजी माजी नामधारी उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच चालू असून जिल्ह्यात हम किसी से कम नहीं कार्यक्रम चालू असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या बीड जिल्ह्यात सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच चालू असून जिल्ह्यात हम किसी से कम नहीं कार्यक्रम चालू आहे. बीड जिल्ह्यातील आमदारकीसाठी सध्या जिल्ह्याभरातून आजी माजी नामधारी नेते पुढारी यांनी विविध पक्षांचे पक्षप्रमुख तथा पक्षश्रेष्ठी यांच्या भेटीगाठी घेऊन आमदारकीचे तिकीट कसे मिळेल यासाठी चुर्शीचे प्रयत्न करत आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले असून बीड जिल्ह्यातील बीड,परळी वैजनाथ,आष्टी, केज, माजलगाव, गेवराई, मतदारसंघातील नेते आणि पुढारी मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले असून याचा फटका जिल्ह्यातील विद्यमान आमदारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या पंधरा वर्षांत बीड जिल्ह्यातील आमदारांनी सर्वसामान्य मतदारांसाठी काय केले. असा सवालही आजच्या घडीला मतदार करत आहेत. याचा पुरेपुर फायदा घेत यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यातील राजकीय पक्षातील नेते पुढारी आणि कार्यकर्ते यांच्यात मोठ्या प्रमाणात घुसमट चालू असून प्रत्येकजण आपल्याला बीड जिल्ह्यातील मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.