गजानन वानोळे ग्रामीण प्रतिनिधी किनवट
किनवट माहूर विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य समितीने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आदिवासी बहुल भाग असलेल्या किनवट माहूर मतदार संघात प्रा. विजय खुपसे यांची उमेदवारी जाहीर केल्याने प्रा.विजय खुपसे यांचे समर्थक व व वचिंत बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यामध्ये . जल्लोष व उत्साह संचारला आहे. किनवट माहूर मतदार संघासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून किनवट येथील प्राध्यापक विजय खुपसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रा.विजय खुपसे यांची विधानसभा निवडणुकीत पहिली उमेदवारी जाहीर झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मतदानाची आकडेवारी काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या समर्थकांत व कार्यकर्त्यात जल्लोष साजरा करण्यात आला असून , प्रा. विजय खुपसे हे आंध आदिवासी समाजातील असून , किनवट माहूर मतदार संघात समाजाच्या प्रत्येक घटकात बहुचर्चित आहेत. आता किनवट माहूर मतदार संघात तिरंगी अटीतटीची लढत पाहायला मिळेल अशा चर्चाना उधान आले आहे. आता महायुती व महाविकास आघाडी कडून कुणाला उमेदवारी जाहीर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून येत्या चार पाच दिवसात सर्वच पक्षाचे तिकीट वाटपाचा तिढा सुटणार आहे. प्रा. विजय खुपसे आदिवासी समाजातील प्रतिष्ठित लोकप्रिय व्यक्ती मानल्या जातात आणि समाजाचे मतदान हे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात निर्णायक मानले जाते आणि इतर समाज प्रा. खुपसे यांच्या पाठीमागे फार मोठया प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतितटीच्या स्पर्धेत वंचित बहुजन आघाडी राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी व महायुती कुणाला उमेदवारी जाहिर करेल यावरून ही बरेच काही अवलंबून आहे. सर्व पक्षाची उमेदवारी घोषित झाल्यानंतर मात्र चित्र स्पष्ट होणार आहे.











