रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला : संतांच्या सभेमध्ये कच्चे ठरवून नामदेव , प्रत्यक्ष अनुग्रहित करून चांगदेव व ताटींच्या अकरा अभंगाच्या माध्यमातून उपदेश करून ज्ञानदेव असे एकूण तीन देव आईसाहेब मुक्ताईने वारकरी संप्रदायाला प्रदान केले. असे अभ्यास पूर्ण मत भागवता चार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.ते आज श्री संत वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आदिशक्ती मुक्ताबाई बारशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित जन समुहाला मुक्ताई महात्म्य सांगत असताना बोलत होते.ते पुढे म्हणाले की रामावता रात भक्तचुडामणी भरताचे प्रेम संपूर्ण जगाला कळावे याकरिता मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रां नी १४ वर्ष वनवासाचे कष्ट भोगले.कृष्णावतारा भक्तसुरत्न पतिव्रता शिरोमणी गोपिकांचे प्रेम जगविख्यात व्हावे याकरिता रास प्रसंगी भगवान गुप्त झाले.तसेच महाभारत युद्धप्रसंगी भगवान श्रीकृष्णां कडील तत्वज्ञान जगताला मिळावे याकरिता भक्तराज अर्जुनाने मोह भासविला. शिशुपाल वधाच्या वेळी भगवान श्री कृष्ण परमात्म्याने त्याचा शिरच्छेद केल्यानंतर सुदर्शन चक्र खाली ठेवून प्रतिज्ञा केली होती , आता यानंतर पुन्हा शस्त्र हातात घेणार नाही .व राहिलेला भूभार अर्जुनाच्या निमित्ताने नाहीसा करेल. म्हणून या चालून आलेल्या सुवर्णसंधीचा फायदा घेत अर्जूनाने मोह भासवून भगवान श्रीकृष्णांना कडून गीतोक्त तत्त्वज्ञान प्राप्त करून जगदोद्धारक तत्त्वज्ञान लोकसुलभ केले . तद्वत भगवान श्री ज्ञानोबा रायांनी आईसाहेब मुक्ताई कडील तत्त्वज्ञान लोकसुलभ व्हावे याकरिता उसनवार आणलेला क्रोध भासून ताटी लावून घेतली. व मुक्ताईस उपदेश करण्या करिता प्रवृत्त करून प्रसंगी स्त्रियांनाही उपदेश करण्या चा मार्ग मोकळा करून दिला.अर्थात मुक्ताईंचा ताटीच्या ११ अभंगातील उपदेश हा मराठी अध्या त्मिक सारस्वताची गंगोत्रीच आहे. वैदिक परंपरेतील गार्गीवाचक्नवी, मैत्रेया आदि विदुषी स्त्रियां समानच वारकरी संप्रदायिक मीराबाई सखुबाई , जनाबाई , सोयरा बाई , बहिणाबाई व मुक्ताबाई या महिला भक्तसुरत्न असल्याचे महाराजांनी यावेळी त्यांच्या जीवन चरित्रांवर प्रकाश टाकून उपस्थितांच्या लक्षात आणून दिले प्रवचनानंतर पारंपारिक पद्धतीने मुक्ताईंचा पाळणा व आरती तसेच कन्या पूजना चा विधीवत कार्यक्रम संपन्न झाल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.


