पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांची घोषणा
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
गेल्या दिड महिन्या पासुन राज्यातील पशुधन पर्यवेक्षक शासनाच्या चुकिच्या धोरणा विरोधात संपावर आहेत. याचा फटका राज्यातील पशुपालक शेतकरी, दुग्ध व्यवसाय करणारे, बकरी पालक, पोल्ट्री व्यावसायिक, मेंढपाळ यांना बसत आहे. पावसाळ्यातील आजार जनावरांवर येत आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबात जावुन तेथील पशुची काळजी घेणार्या पशुधन पर्यवेक्षकांनी काम बंद केले आहे. या सर्व खाजगी व शासकीय पशुधन पर्यवेक्षकांच्या मागण्यांना भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा देण्यात आला आहे. या वेळी जो पर्यंत अंदोलन चालेल तो भूमिपुत्रचा पाठिंबा राहील याची ग्वाही संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिली , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देव इंगोले यांनी केले तर कार्यक्रमासाठी डॉ. भागवतराव महाले, भूमिपुत्र जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, तालुका अध्यक्ष संतोष सुर्वे, खाजगी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चव्हाण, सर्व वर्तमान पत्राचे प्रतिनिधी, ईलेक्ट्रोनिक मीडियाचे प्रतिनिधि तथा डॉ. विष्णु पोपळघट, डाॅ. अमर दहिहांडे, अमोल भारती, बालाजी कोकाटे, भागवत शिंदे, माधव कोघे, गजानन धोंडे, विनोद भेडेकर, नंदकिशोर सावदे, शशीकांत पवार, संजय मनवर, संतोष वाढे, पांडुरंग तायडे, नंदकिशोर केळे, पांडुरंग खंदारे, अभिजीत घुगे, धन॓जय आंधळे, दिपक देव्हढे, ज्ञानेश्वर डाखोरे, पंकज, तुरक यांच्यासह जिल्ह्य़ातील पशुधन पर्यवेक्षक संघटनेचे पदाधिकारी तथा भूमिपुत्रचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.