पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड 30: तालुक्यातील करजखेड भागात पिशोर पोलिसांनी अवैध ठिकठिकाणी अवैध देशी अड्ड्यावर छापे मारून मुद्देमाल जप्त केला आहे.कन्नड तालुक्यातील करजखेड येथे अवैध धंदे जोमाने सुरू होते.या बाबत नागरिकांनी पिशोर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिशकुमार बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार किरण गंडे,नीलकंठ देवरे,वसंत पाटील यांनी परिसरातील अवैध धंदे वाल्यावर कारवाई केली. यात करजखेड बस स्टॅंडच्या बाजूला एका टपरीवर गणेश शेषराव वळवळे हा अवैधरित्या दारू विक्री करत होता. त्याच्या ताब्यातून 26 देशीच्या क्वांटर्स जप्त केल्या आहेत. तसेच महादू विठ्ठल उपळकर यांच्या राहत्या घरी छापा मारून त्याच्या ताब्यातून 31 बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईमुळे अवैध धंदे वाल्याचे धाबे दणाणले आहेत.