गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा ते दानापूर बस सुरू करण्यासाठी तेल्हारा आगार व्यवस्थापक यांना विद्यार्थ्यांनी आज दिनांक 29 जुलै रोजी निवेदन दिले आहे तेल्हारा ते दानापुर बस चालू करण्यात यावी कारण आयटीआय, टायपिंग, क्लास, चालू झाले असून विद्यार्थ्यांची येण्याची दुरावस्था होत आहे सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे बस सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी ही सर्व विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक तेल्हारा यांना निवेदन दिले आहे तरी या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती समजून आपण तेल्हारा ते दानापूर बस लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी दानापूर माळेगाव शेरी चांगलवाडी या गावातील विद्यार्थ्यांनी केली आहे यावेळी हेमंत रोतळे, रोशन खंडारे, अनिकेत घोगले, महेश चिकटे, सौरभ चिकटे, मोहन वरणकार, पवन गायकवाड, मोहन हागे, राजीव वानखडे, अभिषेक पारस्कर, सतीश हागे,राम हागे,आदित्य शिवणकार या विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत