प्रकाश केदारे उपजिल्हा प्रतिनिधी परभणी
दि.१० जुलै शहरासह जिल्हयात बुधवारी सकाळी सात वाजून 14 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.हिंगोली व नांदेड या दोन जिल्ह्यात याच क्षणाला भूकंपाचा धक्का बसला. त्याप्रमाणेच परभणी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी सात वाजून 14 किंवा 15 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला.झरी, बोरी, जिंतूर, वालूर,सेलू, मानवत,पाथरी या भागात हे धक्के जाणवले. अशी माहिती हाती आली आहे. काही नागरिकां ना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला;काहींना धक्क्या ची जाणीव झाली नाही.