संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- तालुक्यातील कुर्ली येथील बाबासाहेब देशमुख विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत बाहेरगावाहून ये-जा करण्याऱ्या मुलींना पायपीट कमी करण्यासाठी मिशन अंतर्गत मिळालेल्या सायकलींचे वाटप करण्यात आले.शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचा शाळेत येण्याचा व पटसंख्या वाढविण्याकरिता विविध शासकीय योजना राबविल्या जातात. अशातच बाहेरगावावरून – पायदळ येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी – मानव मिशन अंतर्गत सायकलदेण्यात येते. यानिमित्त कुर्ली येथील बाबासाहेब देशमुख विद्यालयात मानव मिशनअंतर्गत विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.तसेच या सत्रात दहावीत शाळेतून प्रथम व द्वितीय क्रमांकाने पास झालेल्या मुलींचा सत्कार आणि गरीब व होतकरु मुला मुलींना शालेय गणवेशाचे वाटपच करण्यात आले. पारवा शिक्षण संस्था पारवाचे सचिव अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांच्यासह कुर्ली परिसरातील यांचे निष्ठावान कार्यकर्ते आणि शाळा निरीक्षक समितीचे अध्यक्ष अनिस खान, सरोदे, कापसे यांच्या उपस्थितीत सदर वाटप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला कुर्ली शाळा मुख्याध्यापक राजू दिकुंडवार तथा शाळा शिक्षक, कर्मचारी वृंद, विद्यार्थी वर्गाची उपस्थिती होती.