स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात नुकतीच शिक्षक पालक सभा मेजर श्री भानुदास शिंदे यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाली.या वेळी शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती यांची बैठक होऊन अध्यक्ष ,उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून श्री भीमराव कुदळे, उपाध्यक्ष सौ. राणीताई बांडे यांची शाळा व्यवस्थापन समितीवर निवड झाली. तसेच शाळा व्यवस्थापन व विकास समिती साठी अध्यक्ष- सौ.कांचनताई ओव्हाळ आणि उपाध्यक्ष सौ.शुभांगी ताई हरिहर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चारही पदाधिकाऱ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन यावेळी करण्यात आले या वेळी सौ. कांचन ओव्हाळ यांनी पिंपळाचे झाड देऊन वृक्षारोपण विषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले .व्यवस्थापन समितीमध्ये अनिल बांडे ,सोमनाथ सात्रस नवनाथ कोळपे ,गोरख सात्रस,सौ.सुनीता सात्रस ,सौ. वर्षा धुमाळ,सौ.सविता कोकडे,सौ जयश्रीताई सात्रस विविध विकास कार्यकारी सोसायटी संचालक मोहन सात्रस,शरद गिरमकर,विक्रम पाचुंदकर,विशाल ओव्हाळ,प्रकाश आफळे, यांची बिनविरोध निवड करण्यात आली प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.मिसाळ यांनी केले तर आभार श्री.लोखंडे सर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिसाळ सर यांनी केले.यावेळी सौ.धरणे मॅडम.सौ.जकाते मॅडम ,सौ. सात्रस मॅडम,शालेय व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष संतोष काका सात्रस,दादा तोंडे,समशेर शेख,मन्सूर शेख,शरद बांडे,सचिन जासभाटी,आदी उपस्थित होते.या वेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष भिमराव कुदळे बोलताना म्हणाले की संस्थेने दिलेल्या सर्व शैक्षणिक सोयींचा योग्य वापर करून संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचा सुसंवाद होणे आवश्यक आहे. अशा संवादातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो,











