डॉ विष्णू उकंडे यांच्या प्रेरणा संस्थेचा पुढाकार
संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:-आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे आणि प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने ११ जुलैला घाटंजी येथील इरा इंग्लिश मिडीयम स्कूल खापरी नाका इस्तारी नगर घाटंजी येथे सर्व रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिराचे उदघाटक लोकनेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या हस्ते होत असून प्रमुख अतिथी संपर्क प्रमुख हरिहर भाऊ लिंगनवार उपस्थित राहणार आहे.शिबिरात आजाराची तपासणी व औषध उपचार केला जाईल तसेच आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया केल्या जाईल यामध्ये मेडिसिन तज्ञ .नेत्र रोग तज्ञ .सर्जरी तज्ञ स्त्री रोग तज्ञ बालरोग तज्ञ .सर्जरी तज्ञ. त्वचारोग नाक कान घसा श्वसन रोग तज्ञ.कर्करोग तज्ञ प्रामुख्याने हजर राहणार आहे या शिबिराचे वैशिष्ट्य तज्ञ डॉक्टर कडून मोफत तपासणी केल्या जाणार असून स्त्रियांची मेमोग्राफी तपासणी मोफत केल्या जाईल. भरती रुग्णाच्या सर्वसामान्य चाचण्या मोफत करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये एक्स-रे रक्त लघवी चाचणी सोनोग्राफी अशा प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहे.शिबिरात भरती झालेल्या रुग्णांना खाट व निशुल्क जेवण देण्यात येणार अति विशिष्ट चाचण्या म्हणजे सिटीस्कॅन एमआरआय अशा प्रकारच्या चाचण्या ५०% सवलतीच्या दरात रुग्णांना केल्या जाणार आहे. रुग्णाचे नाव योजनेत समाविष्ट असल्यास रुग्णाच्या आजारावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार विनामूल्य करून देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे अशी परिस्थिती भरती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता वाहनाची व्यवस्था मोफत राहील तसेच शिबिरामध्ये येताना रुग्णानी आधार कार्ड व रेशन कार्ड सोबत आणणे अनिवार्य राहील असे प्रेरणा अध्यक्ष डॉक्टर विष्णू उकंडे यांनी सांगितले आहे. तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे मार्गदर्शन लाभणार आहे.