करामत शाह तालुका प्रतिनिधी, अकोला
आगर : आगर येथील जवळच असलेले चिचखेडा नाल्याचे पुराने पुल गेले वाहुन मागच्या आठवड्यात पुर आल्याने पुलाचे भिंती कोसळले होते .तसेच संबंधित विभागाने काही एक ते दोन गाड्या मुरुम टाकले होते, परंतु पुन्हा एकदा पुर आल्याने मुरुम काही टिकले नाही.वाहतुक झाले ठप्प पुल कोसळल्या कारणांमुळे खुप अडचणी येत असल्यामुळे शाळेतील मुलांना,अपंग, निराधार तसेच शेतकरी वर्गाला त्रास सहन करावे लागत आहे. वाहन येत नसल्याने पायदळ प्रवास करावा लागत आहे.आगर वरुन उगवा पर्यंत शाळकरी विद्यार्थी यांना पायदळ प्रवास करावा लागते. पावसाच्या दिवसामध्ये प्रवाशांचे हाल होत आहे.गेल्या पंधरा दिवसापासून प्रवासी वर्ग ,विद्यार्थी, अपंग ,निराधार, गावातील नागरीक यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच गेल्या पंधरा दिवसापासुन बस सेवा बंद पडलेले आहेत.प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे आगर गावात नाराजी व्यक्त होत आहे.तरी शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच अशा गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी तथा संबधित सर्व विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी गावातील नागरीक,विद्यार्थी, अपंग निराधार करीत आहे.