सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
जुन्नर : (दि .९) महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना ७.५ एचपी पर्यंत थकीत असलेली विज बिल माफ करण्याची घोषणा केली परंतु साडेसात एचपीच्या अधिक अधिभार वापरणारे शेतकरी हे नदी अथवा धरणांमधून भागीदारी पद्धतीने लिफ्ट करत असतात जेणेकरून त्यांना मेंटनस अथवा येणारे बिल हे विभागून भरता येईल परंतु शासनाने याचा अभ्यास न करता ७.५ एसपीच्या वरील आदिभार वापर करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना वीज बिल माफी देण्यात यावी.काही शेतकरी रेगुलर विज बिल कर्ज घेऊन उसनवारी करून भरत असतात त्यांच्यावर देखील शासनाने अन्याय केलेला आहे त्यामुळे त्यांना देखील प्रोत्साहन पर योजना शासनाने लागू केली पाहिजे.तालुका बिबट प्रवन क्षेत्र असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज लाईट मिळावी.सरसकट कर्जमाफी करावी शासनाने घोषित केल्याप्रमाणे सातबारा कोरा करावा.शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा केली त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी.खते औषधे व शेती अवजारे यावरील जीएसटी शासनाने रद्द करावी ,गॅस,पेट्रोल व डिझेल यावरील किमती कमी कराव्या.वरील प्रमाणे मागण्या शासनाने तात्काळ मान्य करून शेतकऱ्यांची सरसकट कृषी पंपांची वीजबिल माफी, सरसगट कृषी कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा. अशा विषयाचे निवेदन श्री.रमेशजी शिंदे ( अध्यक्ष सह्याद्री शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य ) व श्री.विजय गायकवाड माजी सरपंच खोडद यांनी दिले.त्यावेळी श्री.गुलाब पारखे ( माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे )श्री.नितेश काकडे,श्री.ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, श्री. बन्सी टेमगिरे उपस्थित होते.तहसीलदार रवींद्र सबनीससाहेब यांना निवेदनाद्वारे पंधरा दिवसाचे अल्टिमेटम देण्यात आले आहे वरील प्रमाणे मागण्या मान्य कराव्यात अन्यथा पंधरा दिवसानंतर तहसीलदार कचेरी जुन्नर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल वरील मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा.