प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना यांच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे शक्तीपीठ महामार्ग स्मार्ट प्रिपेड चिज मीटरला विरोधासाठी धरणे आंदोलन करूर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले.शक्तीपीठ महामार्गाला विरोध का ? तर कोणाचीही मागणी नसताना व कोणाचाही फायदा नसताना जनतेवर व शेतकरी वर्गाला बेटीस धरणेचा प्रकार निव्वळ कापर्पोरेटला क्षेत्राला मोठे करणेच्या व त्यांना फायद्याच्या हेतुने शेतकरी यांच्या जमीनी संपादन करणे. २७ हजार ५०० एकर जमीन, लाखो झाडांच्या कतली. पाण्याच्या विहीरी, झरे, कुपनलिका, असंख्य कालवे, मोठ मोठे डोंगर फोडणे, जंगल नष्ट करणे व जंगली प्राण्यांना त्रास देणे व उपद्रव करणे, परणामी पाण्यांचा त्रास शेतकरी यांनी सहन करणे. नांव देवाचे पण भाव भांडवलदारांना असे याचे स्वरूप आहे-हजारो एकर शेती संपादन करून सरकार हा रस्ता पुढे रेटत आहे म्हणू आमचा याला विरोध आहे. सध्या सरकारने याला स्थगिती दिली आहे. या अधिवेशनात हा महामार्ग रद्द करून याची अधिसुचना सरकारने न केल्यास १२ जुलै नंतर रास्ता रोको व अन्य प्रकारचे आंदोलन याचा अवलंब करावा लागेल. याची सरकारने नोंद घ्यावी.याच बरोबर स्मार्ट प्रिपेड विज मीटरला विरोध का? तर निव्वळ कार्पोरेट क्षेत्राला मोठे करणेच्या व त्यांना फायद्याच्या हेतुने सरकार हे आमच्यावर लादत आहे सरकार स्मार्ट प्रिपेड विज मीटर मोफत म्हणून फसवी जाहीरात करत आहे. घरातील विज मीटर बाबत आमची कोणाची तकार नाही स्मार्ट पिपेड विज मीटरचा दर बाजार भावापेक्षा जास्त आहे. मीटर जंपीग वारंवार आहे त्यामुळे विज बिल जास्त येते रिचार्ज वेळेत होत नाही. विज सेवा मोठ्या प्रमाणात बंद असते यावर महावितरणकडे व्यवस्था नाही. शिवाय हे केल्याने मीटर रिडींग घेणारे, विज बिलदेणारे, बिलीग विभागात काम करणारे, चिज बिल वसुल करणारे, बिज खंडीत च पूर्ववत सेवा देणारे, मीटर टेस्ट करणारे व विज गेलेनंतर कॉल घेणारे, शिवाय कॅश कलेक्शन करणारे असे जवळ – पास २५ ते ३० हजार कामगार कर्मचारी यांचा संसार उध्वस्त होणार आहे.यामुळे गरिबांना लुटणे व कार्पोरेट ला मोठे करणे असा कार्यकम सध्या देशात सुरू आहे. त्याच्या करिता शेतक-यांच्या जमिनी घेवून दलाल व भांडवलदारांना गोठे करणार आहेत त्यांच्या नंतर स्मार्ट प्रिपेड मीटर बसवून आम्हाला लुबाडून अदानी सारख्या भांडवलदारांना मोठे करणार आहेत. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग व स्मार्ट प्रिपेड विज मीटर याच्या बद्दलचा लुटीचा कार्यकम बंद झाला पाहिजे. वीज वापराच्या यनिट मागे ३० पैसे प्रमाणे मीटरचे वैसे घेवुन ते अदानी ला देवून मालामाल करणार आहेत. सध्या सरकारने ग्राहकांना हे प्रिपेड बिज मीटर घरी बसवणार नाही याची घोषणा केली आहे पण रद्द केल्याची अधिसुचना काढून जाहीर करावे अन्यथा यासाठी देखील १२ जूलै नंतर रास्ता रोको व अन्य प्रकारचे आंदोलन याचा अवलंब करावा लागेल. याची सरकारने नोंद घ्यावी.धरणे आंदोलनातअध्यक्ष कॉ. अतुल दिघे,जनरल सेक्रेटरी कॉ.प्रकाश कांबरे, रजनी पाटील,कॉ सुनिल बारवाडे,कॉ. प्रकाश जाधव,कॉ. सुरेश पाटील, बाळकृष्ण करळे,रविद्र कांबरेसंदिप केरले, उत्तम माने, नरेंद्र मोरे, संताजी जाधव, आनंदा कांबळे, विजय घोलप, रविंद्र वंडकर, एस.के. पाटील, विजय घोलप, अजित पाटील, सुनिल पाटील उपस्थित होती.


