कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
आज दिनांक ६ जुलै 2024 रोजी युवक मंडळ पुसद द्वारा संचालित परमेश्वर माध्यमिक विद्यालय, लोहरा ई. आरोग्य विभाग पंचायत समिती पुसद यांच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग पंचायत समिती, पुसद व परमेश्वर माध्यमिक विद्यालय लोहरा ई येथे नेत्र विकार व दृष्टीदोष निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शेंबाळपिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नेत्र चिकित्सक अधिकारी डॉ . शहाबाज इराणी सहाय्यक विजय कळमकर व इतर सहकारी यांनी विद्यालयातील समस्त विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गावातील समस्त ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला दिला. याप्रसंगी विद्यालयातील १०९ विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली, त्यापैकी पाच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात किरकोळ दृष्टीदोष आढळला. याप्रसंगी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना डोळ्याच्या आरोग्य विषयी मार्गदर्शन केले, व विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयी समाधान व्यक्त केले. सर्वप्रथम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ हिरुळकर मॅडम यांनी समस्त आमंत्रितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शेंबाळपिंपरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश चव्हाण व अमन पठाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता परमेश्वर माध्यमिक विद्यालय लोहरा ई. येथील समस्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने अथक परिश्रम घेतले.


