देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे हसनाबाद व जवळपासच्या गावातील भक्तांनी बद्रीनाथ,केदारनाथ,अमरनाथ ही दिनांक १७जून पासून ते ७ जुलै पर्यंत२१ दिवस यात्रा करून सुखरूप परतल्याने त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने भगवती कालिंका देवी मंदिरात स्वागत सत्कार करण्यात आला.या यात्रेमध्ये मुकेश रमेश पवार,बाळू कचरू खेत्रे,दिपक धनसिंग उंटवाल,रवि सूर्यभान वाघ,भरत विठ्ठल चंदवडे,जनार्दन सर्जेराव जाधव,बबन बाळासाहेब पुंगळे,विशाल दिलीपकुमार लड्डा,वरद संतोष लड्डा,मंगेश बाळूशेठ तांबट,ईश्वर भारतसेठ दशमुखे,योगेश रावसाहेब फुके,अक्षय प्रकाश घोडे यांचा समावेश होता.त्यांनी या एकवीस दिवसात उज्जैन,ओंकारेश्वर,नेपाळ,काशी,अयोध्या, चित्रकूट,हरिद्वार,केदारनाथ,बद्रीनाथ,कुरुक्षेत्र,वैष्णोदेवी,अमरनाथ,पंजाब अमृतसर,वाघा बॉर्डर,अजमेर,पुष्कर व नंतर पुनश्च उज्जैन करून आपल्या जन्मभूमीत सुखरूप पोहोचले आहेत.हे भक्तगण वरील प्रमाणे नियमितपणे यात्रा करतात.या भक्तांचे सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत,सत्कार होत आहे.