नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर ढाणकी अर्धापूर माहूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ आय या नावाने अस्तित्वात आला परंतु हा मार्ग अर्धापूर तामसा आष्टी जवळगाव हरदडा ढाणकी फुलसावंगी पर्यंतच काम झाले या मार्गाचे दोन वेगवेगळ्या निविदा निघाल्या एक अर्धापूर हिमायतनगर तर दुसरी हिमायतनगर फुलसावंगी अशा निविदा एका वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या त्यानंतर या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात होऊन ते काम प्रत्यक्षात अर्धापूर घारापुर बोरी हरदडा ढाणकी फुलसांवगी असे काम झाले अपवाद फक्त मेट ते निगंनुर पाझर तलावापर्यंत डांबरी काम झाले का व कसे हे देवालाच माहित या कामाचे आचार्य अशी आहे की हा रस्ता क्रमांक ७२५ आय हा गुगल वर दाखवायला पाहिजे होता परंतु हा महामार्ग प्रत्यक्षात हिमायतनगर पळसपुर डोलारी बुदली बेचिरग गांजेगाव ढाणकी असा दाखवत आहे बहुतेक मोबाईलवर गुगल शत पतिशत वस्तुस्थिती दाखवत असते गंमत अशी की हा रस्ता घारापुर बोरी ब्राह्मणगाव हरदडा ढाणकी असा दाखवायला पाहिजे होता परंतु हा मार्ग हिमायतनगर पळसपुर डोलारी गांजेगाव मार्गे दाखवत आहे त्यामुळे जनतेची अक्षम्य दिशाभूल होत आहे याच्या मुळाशी काय दडलय आणि काय नाही वस्तुस्थिती नेमकी काय आहे तरी जनतेची दिशाभूल होत आहे जनतेला अनेक प्रश्न पडत आहेत की हा महामार्ग नेमका कोण्या मार्ग मंजूर आहे व कोणत्या मार्ग झाला हा एक प्रश्न जनतेला पडला आहे तेव्हा संबंधित खाते प्रमुखाला या भागातील जनता विचारत आहे की महाराष्ट्राचे अधिवेशन चालू आहे तेव्हा या प्रकरणाचा पडदा पास व्हावा ही जनतेची भावना आहे वरील गुगल फोटो वरून गौडबंगल लक्षात येईलच याबाबतीत नूतन खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना या रस्त्याबाबत पूर्ण कल्पना आहे. पळसपुर मार्गे हा रस्ता होईल त्यांचेच आश्वासन होते असे जानकार मंडळिचे म्हणने आहे.


