राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
एटापल्ली : तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड प्रकल्प मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग बंद केला आहे. तसेच नक्षली पत्रके सुद्धा टाकली आहेत. दरवर्षी नक्षल २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन नागरिकांना केला आहे.
दरम्यान काल पोलीस स्टेशन भामरागड पासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर भामरागड-लाहेरी मार्गावर नक्षली पत्रके व बॅनर आढळले. २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२१ पर्यंत शहीद स्मुर्ती सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी पत्रकातून व बॅनर मधून केले आहे.दरवर्षी नक्षल २८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत पार्टी संस्थापक काँ. चारू मजुमदार, काँ. कान्हाई चॅटर्जी यांना यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ नक्षल सप्ताह पार पाडत असतात. त्याच अनुषंगाने यंदाही नक्षल्यांनी २८ जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन बॅनर व पत्रकातून नक्षल्यांनी केले आहे. “खोब्रामेंढा अमर शहीदो को लाल सलाम . कमरेड्स भास्कर उर्फ पवन, सुखदेव, अस्मिता, अमर सुजाता अमर रहे, अमर शहीदो को अशय को पूरा करेंगे, भारत देश मे नवजनवादी क्रांती को सफल करेंगे. -भामरागड एरिया कमिटी सीपीआय (माओवादी)
असा मजकुर नक्षली पत्रकातून करण्यात आला आहे.