किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर शहरातील व तालुक्यातील सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात विकासात्मक धोरण ठेवणारे ठाकूर शिवकुमार बायस यांच्या जन्मदिनानिमित्त पातूर येथील शिव भोजनालय कि जे नागरिकांना हे गेल्या कोरोना काळा पासून डॉक्टर खुरसडे हे गोरगरीब लोकांना सतत भोजना च्या माध्यमातून सेवा अविरत करत आहेत येथे आलेल्या गोरगरीब शेतकरी महिलांना साडी वाटप पैलवान भोजराज सिंह बायस यांच्या हस्ते व कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले , तसेच पातुर तहसील परिसरात गार्डन सुशोभीकरणाचे काम तहसीलदार दिपक बाजड साहेब यांच्या माध्यमातून सुरू आहे.तेथे ही वाढदिवसाचे औचित्य साधून बगीच्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी नायब तहसीलदार सैय्यद ऐसानोद्दीन यांनी सुद्धा एक वृक्ष ठाकूर शिवकुमार बायस यांच्या जन्मदिनी लागवड करून जगवण्याचा निर्धार केला आहे , पिंपळेश्वर मंदिर येथे जाऊन कार्यकर्त्यांनी ठाकूर शिवकुमार बायस यांचे दीर्घ आयुष्यासाठी पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे महाआरती केली यावेळी पातुर तालुका विकास मंचाचे कार्यकर्ते गणेश गाडगे, पातूर शहर युवा सेना प्रमुख योगेश फुलारी, इंजिनियर राहुल अत्तरकार साहेब, साप्ताहिक अधिकार नामाचे जिल्हा प्रतिनिधी किरण कुमार निमकडे, जी सी एन केबल नेटवर्क व आर आर सी केबल नेटवर्क चे स्वयंसेवक अजित अलाट, रंजीत गाडेकर, शुभम हजारे, खोज मास्टर वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी रामेश्वर वाडी, पिंपळेश्वर व्यायाम शाळेचे पैलवान महेश बोचरे , मधुकर राखोंडे, विठ्ठल डिके, विजय राऊत, गोपाल तायडे आदींनी उपक्रम राबविले