गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा:-ग्रामपंचायत कार्यालय व पी एम श्री जिल्हा परिषद शाळा नारखेड येथे दिनांक १ जुलै२०२४ रोजी वाढत्या तापमानाला आळा घालून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वृक्षरोपन मोहिमेतील वृक्ष लागवडीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांचे निर्देशानुसार नांदुरा तालुक्यातील ग्राम नारखेड येथे दिनांक १ जुलै २०२४ रोजी ग्रामपंचायत,अंगणवाडी, शाळा य यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आले. सन २०२४..२५ चे पावसाळ्यात माननीय उपमुख्य कार्य अधिकारी व माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या निर्देशानुसार प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दहा झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रति विद्यार्थी व प्रति शिक्षक एक झाड व अंगणवाडीला पाच झाडे असे उद्दिष्ट देण्यात आले असून त्या अनुषंगाने ,१ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात नारखेड येथे वृक्षारोपण करण्यात आले. .यावेळी नारखेड गावचे सरपंच प्रसेनजींत खंडेराव यांच्यासह उपसरपंच बबीता डाबेराव ग्रामपंचायत सदस्य गजानन डाबेराव दीपक देशमुख सचिव, विशाल दाभाडे ग्रामपंचायत कर्मचारी अरुण गाडे वासुदेव फेरण शत्रुघन डाबेराव व सर्व ग्रामपंचायत सदस्य , शाळेचें मुख्याध्यापक, रवींद्र आखरे सर्व शिक्षक,अंगणवाडी सेविका सीमा तायडे संगीता राजपूत पुष्पा सुशीर सविता तांदळे ज्योती डाबेराव शारदाताई रोजतकार तसेच गावतील महिला बचत गटाच्या सर्व सदस्य,विद्यार्थी तसेच नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.