मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी: पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगंनबोडी हेट्टी येथे 01/07/2024 शाळा पूर्व तयारी मेळावा मोठ्या थाटात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप सोमंनकर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कीर्ती सातपुते यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी प्रमुख आतिशी म्हणून दीपक वासेकर देविदास कुंघडकर मारोती बारसागडे वर्षा बारसागडे विनोद सोमंनकर अंगणवाडी सेविका विमल सातपुते अंगणवाडी मदतनीस सरिता जुवारे शाळेचे मुख्याध्यापक नागुलवार सर देवकत्ते सर व आदि मान्यवर उपस्थित होते शैक्षणिक वर्ष2024-25 मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी हा मेळावा आयोजित केला जातो यात निरनिराळ्या सात स्टॉल्सवर भरती पात्र विद्यार्थ्यांचा भावनिक सामाजिक बौद्धीक गणन भाषिक शारिरीक व मानसिक विकसन याक्षमता प्रामुख्याने तपासल्या गेल्या पालकांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले यावेळी भरती पात्र विद्यार्थ्यांना आनंद प्रत्येक विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पालकांनीही यात उत्स्फुर्त सहभाग घेतला विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करण्यात आले.











