मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे : शहरातील जुना बस स्टॅन्ड ते संताबाई यादव नगर मध्ये जाणाऱ्या मार्गावर वैभव रेस्टॉरंट जवळ मागील काही दिवसापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी शुबाबडीचे झाडाच्या फांद्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. त्या फांद्या रस्त्यावर लटकत आहेत जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. येथे नेहमीच दोन वाहन हे जा करताना अपघात होण्याची दाट शक्यता असते त्यामध्येच रात्रीच्या वेळी नगरपरिषदे द्वारा लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट बंद असल्या कारणाने या मार्गावर सगळीकडे काळोख पसरलेला असतो यामुळे येथे पैदल चालणाऱ्या व्यक्तीला मोबाईलचा टॉर्च लावून चालावे लागते या मार्गा वर अर्ध शहर वसलेला आहे असे असून सुद्धा संबंधित विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.