महेंद्र गोदाम ग्रामीण तालुका प्रतिनिधि अंबाजोगाई
दि.१ जुलै २०२४ अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसरात अवैध धंदे बोकाळले असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस प्रशासन आणि घाटनांदूर येथील स्थानिक पोलिस चौकीतील कर्मचारी मात्र या प्रकाराकडे जाणीवपूर्वक बघ्याची भुमिका घेताना दिसत आहे.घाटनांदूर गावात आणि परिसरात अवैध बोकाळल्याचे मत गावातील नागरीकांतून येत आहे. या प्रकाराकडे अंबाजोगाई ग्रामीण पोलिस प्रशासन दुर्लक्ष होत असल्याचे मत जनतेतून येत आहे. घाटनांदूर हे गाव अंबाजोगाई अहमदपूर महामार्गालगत असून गावात आठवडी बाजार भरत असतो तसेच गावात आणि परिसरात कुठला अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरीकांच्या तक्रारीसाठी गावात पोलिस चौकी उभारलेली असून या पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी कर्तव्यावर असताना घाटनांदूर स्थानिक पोलिस चौकीच्या आणि अंबाजोगाई ग्रामीण पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैध धंदे बोकाळल्याचे मत गावातील आणि परिसरातील नागरीकांतून येत आहे. गावात भर दिवसा अवैध दारू विक्री, मटका , जुगार असे अनेक अवैध धंदे खुलेआम सुरू असून ठिकठिकाणी गावठी दारूची निर्मिती विक्री व वाहतूक सुरू आहे. या प्रकाराकडे अंबाजोगाई ग्रामीण पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे मत जनतेतून येत आहे. तसेच अवैध धंदे आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन आणि कायद्याचा वचक राहिलेला नाही, असे घाटनांदुर येथील नागरिकांचे मत येत आहे .