निशांत मनवर तालुका प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड (दिनांक 30 जून) आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होते की दिनांक 26 जून 2024 रोजी उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथील नदीपात्रात दोन शाळकरी मुली व त्यांना वाचविण्यास गेलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.कुमारी कावेरी गौतम मुनेश्वर (15) ही विद्यार्थिनी आपल्या मामाच्या घरी सावळेश्वर येथे आली होती. तिची मैत्रीण कुमारी अवंतिका राहुल पाटील (14) ह्या दोघीजणी गावाच्या शेजारून वाहणाऱ्या पेनगंगा नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुऊन झाल्यावर आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून चेतन देवानंद काळबांडे आणि शुभम काळबांडे हे दोन विद्यार्थी मदतीसाठी धावून आले.आपल्याला वाचविण्यासाठी आलेल्या चेतनला कावेरी व अवंतिका यांनी मृत्यूच्या भीतीने घट्ट पकडले व त्यामुळे तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.मागील काही दिवसांपूर्वी चेतनच्या वडिलांचे साप चावल्याने दुर्दैवी निधन झाले. आपल्या छोट्याशा घरात दोघं माय लेकरं व एक अपंग बहीण आहे ते काम करून जीवन जगत होते. परंतु नियतीने आज मुलगाही हिरावला.त्यामुळे चेतन काळबांडेच्या कुटुंबाला आपल्या मदतीची गरज आहे. म्हणून आपल्या 100, 200, 300, 400, 500, 1000 रुपयाने चेतन काळबांडे परत येणार नाही पण एका आईला आपल्याशिवाय दुसरा कोणताही आधार नाही. चला आज या संकट समयी एका आईला मदत करून तिचा मुलगा होऊया.पती वारल्यावर एकमेव आधार मुलगा होता पण आज तो ही नाही. कसे जगणार ती माऊली..सोबतीला एक अपंग मुलगी आहे.दिलेल्या नंबरवर जेवढे शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करावी आणि त्याचा स्क्रीनशॉट आपले धम्ममित्र साहेबराव इंगोले यांना पाठवावे 9637345772 असे नम्र आव्हान अनिल कांबळे (फोन पे 7756889190) सावळेश्वर गावाचे पोलीस पाटील यांनी केले आहे.