कैलास श्रावणे तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला काही ठिकाणी फारसे यश जरी नसले मिळाले तरी पण यवतमाळ जिल्ह्यात मात्र चांगला परफॉर्मस दिसून आला. त्याच अनुषंगाने पक्षाच्या राज्य कमिटीने यवतमाळ जिल्ह्यावर फोकस करण्याचे ठरवलेले असून आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्याचे प्रवक्ते तथा यवतमाळ जिल्हा निरीक्षक ॲड.प्रियदर्शी तेलंग यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह पुसद येथे पुसद व उमरखेड विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने पुसद विधानसभेमध्ये २०५२० मतदान झाले असल्यामुळे व उमरखेड,महागाव विधानसभेमध्ये पक्षाला चांगला जनाधार मिळाल्याचे जिल्हा निरीक्षक ॲड.तेलंग यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले, तोच जनाधार टिकून ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये इतर समूहाला पक्षाच्या विचारधारेशी जोडून विजयाच्या दिशेने कसे जाता येईल यासंबंधी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमरखेड व पुसद विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे बूथ लेवलपर्यंत काम केले तर वंचित बहुजन आघाडीला विजयापर्यंत जाण्यास कोणीही रोखू शकत नाही, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम यांनी दोन्ही विधानसभेतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अंग झटकून कामाला लागण्याच्या सूचना केल्या.यावेळी माजी जिल्हा महासचिव डि के दामोधर यांनी बुथ बांधणी संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा निरीक्षक यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. अमोल कांबळे यांनी तर प्रास्ताविक बुद्धरत्न भालेराव तालुका अध्यक्ष पुसद यांनी केले.व आभार प्रदर्शन पुसद शहराध्यक्ष जयानंद उबाळे यांनी केले.या कार्यक्रमास संजय मुजमुले जिल्हा कार्यकारणी सदस्य,प्रल्हादराव नवसागरे महागाव तालुका अध्यक्ष,संबोधी गायकवाड उमरखेड तालुका अध्यक्ष,भारत कांबळे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पुसद, विद्या नरवाडे महिला आघाडी तालुका अध्यक्ष पुसद, किशोर कांबळे भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष यवतमाळ,एस के मुनेश्वर तालुका महासचिव उमरखेड,गणेश पाईकराव तालुका महासचिव महागाव, सय्यद खालिद तालुका संघटक उमरखेड,इंजिनीयर यशवंत कोल्हे इंजिनियर संदीप आढाव, मधुकर सोनवणे, प्रणव भागवत, मधुर खिल्लारे,राहुल कांबळे,बबन टाळीकोटे, आकाश पठाडे, संदीप मनवर, बाबुराव वाढवे, राहुल जोगदंडे, कमल पाईकराव, सुनंदा धबाले, कर्मणकर , कल्पना साळवे यांच्यासह पुसद उमरखेड विधानसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिसरात घेतले.