रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय तेल्हारा यांच्या वतीने दिनांक 02 जून 2024 वार रविवार ला सकाळी 9 वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय प्राणां गण मध्ये घरगुती बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यातआले आहे.तेल्हारा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणा त सोयाबीन पिकाचे क्षेत्र असून यावर्षी लवकरच मान्सूनची सुरुवात होणार आहे त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुण वत्तेचे व माफक दरात घरगुती बियाणे उपलब्ध व्हावे याच अनुषंगाने तालुक्यामध्ये कृषी विभागामार्फत घरगुती बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला श्री. शंकर किरवे व प्रकल्प संचालक आत्मा डॉ.मुरली इंगळे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार समाधान सोनावणे व गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा अमितकुमार मुंडे उपस्थित असतील. या महोत्सांमध्ये सोयाबीन तूर उडीद मूग या पिकाच्या विविध जातीचे बियाणे शेतकऱ्यामार्फत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.यावर्षी अनेक नामांकित कंपन्याचे सोयाबीन बियाण्याचे भाव अत्यंत जास्त असल्यामुळे आपला उत्पादन खर्च टाळ ण्याकरता शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे वापरावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.या महोत्सवामध्ये कृषी विभागा मार्फत सोयाबीन उगवण शक्ती तपासणी व सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिके करून दाखवण्यात येणार आहेत. विविध शेतकऱ्या मार्फत विविध जातीचे बियाणे मोसामध्ये उपलब्ध होणार असून सदर बियाण्या ची उगवन शक्ती तपासणी यापूर्वीच कृषी विभागामार्फत करण्यात आलेली आहे त्या मुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सदर महोत्सात उपस्थित रहावे व घरगुती बियाणे खरेदी करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी केलेले आहे


