सुदर्शन गोवर्धन तालुका प्रतिनिधी सावली
दिनांक :- 30 मे 2024सावली :- तालुक्यातील मौजा.सोनापूर येथे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे, गाव काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.डोमाजी शेंडे, युवा कार्यकर्ता मा.अविनाश भुरसे यांच्यात वतीने सदर मदत देण्यात आली.सविस्तर वृत्त असे की,मौजा.सोनापूर येथील श्री. गजानन दाजी भुरसे यांच्या पोटात वारंवार दुखतं यायचे, वारंवार तबेत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले, घरातील आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळाली राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सदर मदत मिळवून दिली.आर्थिक मदत देताना जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी व्याहाड बुज मा.सुनील बोमणवार,मा.दिपक गद्देवार,सोनापूर ग्राम काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष मा.देवराव भांडेकर,हिरापूर चे उपसरपंच मा.शरद कन्नाके,बुथ प्रमुख मा.दत्तू गुरनुले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.श्रीधर सोनुले, ग्रामपंचायत सदस्य मा.नामदेव सोनुले,मा.नीलकंठ भांडेकर,मा.विलास भोयर, मा.कवी बोलीवार,मा.डोपाजी वाघाडे,मा.अरुण भांडेकर आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.