राहुल दुगावकर तालुका प्रतिनिधी, बिलोली
बिलोली येथील तहसील कार्यालयात मागील तीन महिन्यापासून नवीन शिधापत्रिका मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले असून, अनेकांना शिधापत्रिका नसल्याने शासनाच्या आरोग्य उपचार सुविधांसह अन्य योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होत आहेत. तालुक्यात शिधापत्रिका वाटपातील अनियमितता अनेक दिवसापासून कायम आहे. सद्यः स्थितीला तहसीलचा पुरवठा विभागात नवीन शिधापत्रिका पाहायला मिळत नसताना बाहेरून आलेल्या नवीन शिधापत्रिकाला नोंदणीकृत करण्याचे सोपे काम करून, लाभार्थ्यांची वेळ मारून नेत आहे. पूर्वी येथील तहसील कार्यालयाला प्राप्त नवीन शिधापत्रिकाचे वाटप नियमानुसार, गरजवंत किंवा गहाळ झालेल्या लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिका वाटप केले नाही. त्यामुळे आजमितीस शिधापत्रिकाधारक कुटुंबासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. तहसील कार्यालयात शिधापत्रिका गहाळ झालेले किंवा विभक्त कुटुंब झालेले अनेक लाभार्थी नवीन शिधापत्रिका बनविण्यासाठी रीतसर मागणी अर्ज देऊन नियमानुसार शुल्क भरणा करायला तयार आहेत, परंतु तहसीलच्या पुरवठा विभागात चकरा मारूनही ते मिळत नाही. अनेक गोरगरीब कुटुंबातील सदस्यांना शिधापत्रिका नसल्याने शासनाच्या मोफत आरोग्य उपचार सुविधांचा लाभ मिळत नाही. असे असताना तहसील कार्यालय, पुरवठा विभाग याबद्दल बेफिकीर आहे. तालुक्यात नवीन शिधापत्रिकाची मागणी होऊ लागली आहे. पूर्वी झालेल्या नवीन शिधापत्रिकाचे तहसील, रास्त भाव दुकानदारांनी व्यवस्थितरीत्या वाटप केले नाही. पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार पदमवार साहेब यांना याबद्दल विचारणा करण्यासाठी दूरध्वनीवर संपर्क केले असता त्यांचा फोन बंद होता. परंतु खेडे गावातील राशन दुकानदार सर्रासपणे अवाच्या सव्वा पैसे घेऊन काम करत आहेत पुरवठा विभागात काम बंद असताना हे रास्त भाव दुकानदार काम कुठं करत आहेत. हे मात्र गुलदस्त्यात आहे. यापूर्वी तहसीलला प्राप्त नवीन शिधापत्रिका कुणाला वाटप झाले ? किती रास्त भाव दुकानदारानी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविले याची तपासणी करण्याची गरज आहे. नवीन शिधापत्रिकाबद्दल निर्णय घेऊन मागणी करणाऱ्यांना विनाअडथळा शिधापत्रिका वाटप करण्याची गरज आहे तसेच राशन कार्ड विभक्त करणे, नावं समाविष्ट करणे, नावं दुरुस्ती करणे, नावं कमी करणे, ई शिधापत्रिका काढणे इत्यादी सुविधा सुरु करून पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार थांबवावा अशी मागणी बिलोली तालुक्यातील जनता करत आहे.