देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन तालुका तहसील अंतर्गत सुरुवातीला तलाठी व तद्नंतर पदोन्नतीने मंडळ अधिकारी झालेले केदारखेडा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी शाहूराज कदम आपल्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर ३१ मे २०२४ रोजी ३९ वर्षे ६ महिने सेवा देऊन महसूल विभागातून सेवानिवृत्त झाले आहे.शाहूराज पंडितराव कदम यांचा जन्म १४ मे १९६६ ला हासोरी बुद्रुक तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे झालेला होता,त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले होते त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे.त्यांना ०१/०९/१९८४ रोजी हजरी सहाय्यक म्हणून प्रथम नियुक्ती आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी मिळाली होती तर नंतर ते २००० ते २००९ पर्यंत शिरूर कासार जिल्हा बीड येथे व २००९ बीड येथून जालना जिल्ह्यातील जाफराबाद या ठिकाणी तलाठी म्हणून त्यांनी २९/१२/२००९ पासून कामाला सुरुवात केली तद्नंतर माहोरा ता जाफराबाद येथून भोकरदन तहसील कार्यालय अंतर्गत तलाठी सजा हसनाबाद येथे २६ जुलै २०१८ रोजी रूजू झाले.त्यांना १ एप्रिल २०२४ रोजी शासनाने पदोन्नतीने बढती देऊन मंडळ अधिकारी म्हणून नियुक्त केले ते केदारखेडा या ठिकाणी मंडळ अधिकारी म्हणून काम पाहत होते,त्यांच्याकडे अतिरिक्त मंडळ अधिकारी हसनाबाद व अतिरिक्त मंडळ अधिकारी जानेफळ दाभाडी यांचाही अतिरिक्त पदभार होता.त्यांनी भोकरदन तालुक्यात जवळपास साडेतेरा वर्ष महसूल विभागात तलाठी व प्रमोशन नंतर मंडळाधिकारी म्हणून आपले कर्तव्य जबाबदारीने पार पडलेले आहे.शासकीय नियमानुसार वयोमानामुळे ते दिनांक ३१ मे २०३४ रोजी निवृत्त झाले असून त्यांच्या निवृत्ती बद्दल हसनाबाद येथे त्यांचा सत्कार,सन्मान करण्यात आला व सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.सेवा निवृत्ती निमित्त उपविभागीय अधिकारी डाॅ.दयानंद जगताप,तहसीलदार संतोष बनकर,नायब तहसिलदार बालाजी पुप्पलवाड,नरेंद्र ऊखळकर यांनी मंडळ अधिकारी कदम यांना शुभेच्छा दिल्या आहे.या सेवा निवृत्ती च्या कार्यक्रमासाठी सिरजगाव मंडप चे तलाठी आर के अवताडे,पिंपळगाव शेर चे तलाठी बि डी म्हसलेकर,केदारखेडाचे तलाठी डी डी गाडेकर,वालसा खालसाचे तलाठी अमोल तळेकर,सिरजगाव (वा.)चे तलाठी आर ई पंडित यांच्यासह सरपंच सुरेश काकाजी,सरपंच गजानन पुंगळे,माजी सरपंच विष्णू अंभोरे,चेअरमन गणपत माऊली,माजी चेअरमन बाळूमामा पुजारी,ग्रामपंचायत सदस्य जनार्दन खरात,पत्रकार संघाचे अध्यक्ष देवलाल आकोदे,पत्रकार बालकृष्ण रासने,राजेश गरुड,प्रदीप जोशी,बबन पुंगळे,माजी उपसरपंच पुंजारामशेठ,व्यापारी आण्णा सुरासे,ढसाळ आप्पा,बाबुराव महाराज,भिकनदास बैरागी महाराज यांच्या सह गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.या कार्यक्रमाचे नियोजन महसूल मित्र निलेश राठोड,राजू पवार,रामू मोहिते यांनी केले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आकोदे यांनी केले.