संतोष पोटपिल्लेवार तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- दि/३१ मे२०२४ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सामान्य रुग्णालय यवतमाळ यांचे अंतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यवतमाळ द्वारा कामगार चौक यवतमाळ येथे पथनाट्य कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. जनमानसात तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ चे व्यसन मोठ्या प्रमाणात दिवसागणिक वाढत असल्यामुळे जनहितार्थ प्रचार जनजागृती पथनाट्य द्वारे करण्यात आली. सर्व प्रथम लोक गिते व प्रकल्प गिते घेवून वातावरण निर्मिती करत तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ ला आजच नाही मना असा लोकगितातुन संदेश दिला.घाटंजी तालुक्यातील शिरोली येथील नवचैतन्य बहु. विकास युवा मंडळ या संस्था चमुने जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त, स्त्री रूग्णालय यवतमाळ, समोर कामगार चौक यवतमाळ या ठिकाणी पथनाट्य द्वारे तंबाखू, बिडी, सिगारेट, खर्रा, गुटखा, पान मसाला इ तंबाखू जन्य पदार्थ शरीरासाठी किती घातक आहे त्या मुळे कर्करोगा सारख्या महाभयंकर रोगाला बळी पडावे लागते, पुरूषांच्या लैगिंक जीवनावर सुध्दा या व्यसनाचे परीणाम होते त्याच बरोबर धुम्रपान करणा-या व्यक्तीच्या संपर्कातील गर्भवती मातेला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते.तरुण पिढी मध्ये अनुकरण करण्याच्या माध्यमातून धुम्रपान चे व्यसन जास्त वाढत चालले आहे. त्याला आळा बसवने गरजेचे आहे. वाईट संगतीचा विरोध करने काळाची गरज आहे, व्यसना पासुन दुर राहण्यासाठी पथनाट्य द्वारे लोकांच्या समस्या लोकांना समोर मांडुन त्याचे निरासरण कसे करावे याचे मार्गदर्शन मनोरंजनाद्वारे या टीमच्या कलावंतांनी केले . जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यवतमाळ चे मा.डाॅ.श्री राठोड सर जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांनी कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांना तंबाखू व धुम्रपान शरीरासाठी किती हानीकारक आहे व तंबाखू व धुम्रपान आजच सोडावे या बाबत मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे सांस्कृतिक प्रमुख प्रफुल्ल रामकृष्ण राऊत यांनी देखील तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ पासुन दुर राहण्याचे आव्हान नागरीकांना केले. कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी याची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. तसेच कार्यक्रमाला हजारो नागरीक उपस्थित होते. संस्थाच्या टिम ने जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ (राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम)च्या डाॅ. मनाली बांगडे /बेले मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी सादर करण्यात आला.पथनाट्य कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी संस्था चमुचे प्रफुल्ल रा. राऊत, राहुल जीवने, कु.रिना केशरवानी, प्रशांत लोखंडे, नरेश कुंटलवार, उल्हास लोखंडे, मारोती पेंदोर, गणेश उईके यांनी अथक परिश्रम केले.