विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ:उमरखेड तालुक्याती साखरा येथील अल्प भूधारक शेतकरी अशोक लमगे यांनी दुष्काळावर मात करून आपल्या १हेक्टर क्षेत्रावर पेरूची लागवड केली आहे.त्यामधे अंतर पीक म्हणून मिरची पत्ता गोबी या भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केली आहे.त्याच बरोबर शेवगा मोसंबी संत्री अंबा चिकू काळी जांबुल पांढरे जांभूळ चीली यासारख्या विविध प्रकारची फळांची झाडे लावले आहेत.२हजार जांब ६००शेवगा ८०अंबा चिली१ड्रॅगन फूड १० असे विविध प्रकारचे रोपे लावली असून यापासून १वर्षामध्ये १२ते१३लाख रुपये येवढे उत्पन्न होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.संपूर्ण शेती सी सी टी वी चे नजरेमधे आहे.सर्व शेतीसाठी ठिबक तुषार सिंचन यांच्या मदतीने पाणी दिले जाते.विजेच्या भरोष्यावर न राहता सौर यंत्रणा देखील आपल्या शेतात बसवली आहे.विशेष म्हणजे संपूर्ण शेती सेंद्रिय खते वापरून केली जातं आहे त्यामुळे बऱ्या पैकी खर्च वाचवला जाऊ शकते.गांडूळ खत जीव अमृत स्वत तयार करतात .या शेतमधे अशोकराव मारोतराव लंमगे हे आणि त्यांच्या पत्नी मेहनत करून बाग तयार करतात.या कामासाठी त्यांचा मुलगा सकाळी थोडी फार मदत करतो .