सेमी माध्यमाचा 100% तर मराठी माध्यमाचा 99 %टक्के निकाल
दिपक केसराळीकर ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
तालुक्यातील खतगाव येथीलमाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली असून, मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दि. 27 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन प्रणाली द्वारे घोषित करण्यात आला. यात खतगाव केंद्राचा सेमी माध्यमाचा100% तर मराठी माध्यमाचा 99% निकाल लागला असून, दोन्ही माध्यमात मुलींनी बाजी मारली आहे. सेमी माध्यमाचे एकूण 54 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर मराठी माध्यमाचे एकूण 38 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी सेमी माध्यमाचे 54 पैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर मराठी माध्यमाचे 38 पैकी 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सेमी माध्यमातून एकूण 50 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर 4 प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मराठी माध्यमातून विशेष प्राविण्यात एकूण 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून,प्रथम श्रेणीत 20 विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत 4 उत्तीर्ण झाले आहेत. सेमी माध्यमातून कु.ऋतुजा शंकर मुद्दलवार हिने 94. 60% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर कु. पेटेकर कांचन मष्णा या विद्यार्थिनीने 94% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. व कु. भंडारे रोहिणी देविदास हिने 92.40% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला आहे . तर मराठी माध्यमातून कु.आरती चंद्रकांत वाघमारे हिने 87. 60% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने घवघवीत यश संपादन केले आहे.तर कु. कोटचिरे निकिता शंकर हिने 86.80% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. व पेटेकर शिवशंकर केरबा या विद्यार्थ्याने 92.40% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळविला आहे. या घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थाचालक माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर व संस्थेचे सचिव बाळासाहेब पाटील खतगावकर जि.प. माजी सदस्या डॉ. मिनल पाटील खतगावकर मुख्याध्यापक पिन्नलवार, सहशिक्षक प्रकाश बुद्धेवार यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)