जलील शेख,तालुका प्रतिनिधी, पाथरी
पाथरी येथील मोमीन मोहल्लाचे रहिवाशी मोहम्मद इसाक अन्सारी हे पवित्र हज यात्रेसाठी उमराह करण्यासाठी गेले असता त्यांचा जगभरात मोठी मान्यता असणाऱ्या मक्का येथेच २९ मे गुरुवार रोजी मृत्यू झाला.मोहम्मद इसाक अन्सारी हे अनेक वर्ष एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते.याच प्रमाणे पाथरी तहसीलच्या वाहनावर त्यांनी काही वर्ष आपली सेवा बजावली होती.हज यात्रेला जाण्यापूर्वी त्यांनी हज यात्रेकरूसाठी ठेवण्यात आलेल्या शहेजाद लाला यांच्या स्नेहभोजानाच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. मोहम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान असणाऱ्या पवित्र अशा मक्का शहरात त्यांना देवाज्ञा झाल्याने संपूर्ण पाथरी शहरात त्यांच्यविषययी आदरयुक्त चर्चा होताना दिसत आहे.कारण हज यात्रेत मरण येणे इस्लाम धर्मात मोठे भाग्य समजले जाते.


