अजीज खान
शहर प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी : शहरात अवैध रेती धंदे फोफावले असून अवैध रेती मधून जास्तीत जास्त ट्रीपा मारून पैसे कमविण्याच्या नादात भर चौकातून व गल्ली बोळींतून नशा करून व परवाना नसलेले चालक भर धाव ट्रॅक्टर पळवीत असल्याने अपघात होत असून शासनाचा महसूल बुडवत आहे .वृतपत्रामधून निर्दनास आणून सुद्धा पोलीस प्रशासन व महसूल विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र आहे.ढाणकी मध्ये मंडळ अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणामुळे काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास ढाणकी येथील खरूस रोडवरील कोठारी पेट्रोल पंपाजवळ रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चार युवकांना जोरदार धडक दिल्याने अतिशय गंभीर अपघात झाला आहे.त्या चौघांना अपघात स्थळावरुन उचलून ढाणकी येथील सरकारी दवाखान्यात दाखल केलं असता किमान एक दिड तास त्या दवाखान्यात कोणीही नसल्या कारणाने नागरिक संतापले होते.काही सुज्ञान नागरिकांनी संबंधित डाॅक्टरांना व तसेच पोलिस प्रशासनाला कळविले व त्या नंतर डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातात पडलेल्या युवकांना प्राथमिक उपचार केल्यानंतर उमरखेड येथील सरकारी दवाखान्यात रेफर केले .तिथे सुद्धा त्या चौघांना दवाखान्यात दाखल केलं असता तेथील डॉक्टरांनी सांगितले की यांना नांदेड येथे घेवून जावं लागेल कारण हे सर्व अतिशय गंभीर अवस्थेत आहे.चार युवक पैकी दोन युवक जास्त गंभीर आहे या दोन युवका पैकी एकाला ( तोसीफ) मुंबई किंवा हैदराबाद ला रवानगी करावी लागेल असे सांगण्यात आले.अपघातात पडलेले चार ही मुलं अतिशय गरीब आहेत आणि घर बांधकामावर जावुन आपलं उदरनिर्वाह चालवत होते….!रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टरने या चौघांना उडवून तो ट्रॅक्टर सहित स्वतः फरार झाला.यावर नागरिक रोष व्यक्त करत,ढाणकी मध्ये धडाल अवैध रेती उतखन्न करणाऱ्या माफियाची संख्या वाढत असून रेती माफिया यांना सहकार्य व अभय देणारे ते कोण? शासनातील नं दिसणारे हात कोणाचे जे यांना सहाय्यय करत आहे? यामुळे यांना कोणाचंच भय राहिलेला नाही ?अशी चर्चा मात्र पुर्ण ढाणकी शहरातील जनता मध्ये जोरदार चालू आहे.वृत लिहिपर्यंत पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यात आली नव्हती.











