दिपक केसराळीकर
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
बिलोली : तालुक्यातील मौजे सगरोळी येथील रेती घाटावर दिवस रात्र रेतीची वाहतुक सुरू आहे.घाटातून अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त दुप्पटीने रेती उत्खनन करत चोरट्या मार्गाने रेतीची विक्री करत असल्याने रेती घाटाची व रेती डेपोची ई.टी.एस.मशिन द्वारे मोजणी करुन ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे शंकर पवार यांनी मा.जिल्हाधीकिरी यांच्या कडे केली आहे महसुल मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला रेती डेपो म्हणजे रातोरात श्रीमंत होण्याचे साधन सध्या तरी बिलोली तालुक्यात बनल्याचे दिसुन येत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.सगरोळी येथील गट क्रमांक ३६१ व ३६२ व इतर गटात हजारो ब्रास रेती साठा नियमांची पायमल्ली करत साठवून ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .ठेकेदारा बिनधास्त पाच ते सहा जे.सी.बी.च्या साह्याने पाच ते सहा फुट खड्डे करत रात्रंदिवस अवैद्दरित्या रेती उत्खनन केले जात आहे. (हायवा) टिपर च्या सहायाने रेती चोरट्या मार्गाने देगलुर मार्गे बिदर कर्नाटक राज्यात विक्री केली जात आहे. तरी देखील महसूल प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर महसूल प्रशासन गप्प का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व पोलिस यंत्रणा बघ्याची भुमिका घेत आहे.तरी मा.जिल्हाधीकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालून सगरोळी रेती घाटातील अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त रेती उत्खनन केलेल्या रेती घाटाची ई.टी.एस.मशीन द्वारे मोजणी करुन समधीत ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी हिन्दी मराठी तालुका पत्रकार संघटनाचे तालुका अध्यक्ष शंकर पवार यांनी एका निवेदनाद्वारे मा.जिल्हधिकिरी यांच्या कडे केली आहे.











